भूम (प्रतिनिधी)- एसटी भाडे वाढ इतर मागण्यासाठी दि. 27 जानेवारी रोजी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने भूम येथील गोलाई चौक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

एस.टी. दर भाडेवाढ रद्द करणे, उपविभागीय मध्यवती आवक विभाग,दूध दर वाढ वाढीव मिळणे बाबत,शेत माल दर वाढीव मिळणे, पवनचक्की चालविणाऱ्या कंपनन्याकडून झालेल्या कामाची रितसर रॉयल्टी शासनाने भरुन घ्यावी. या मागण्यासाठी करण्यात आले. सध्याच्या सरकारने मागील तीन ते चार दिवसापासून एस.टी.ची दर वाढ 15% केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेच्या खिशास नाहक भुर्दड सोसावा लागत आहे. एस.टी. सर्वसामान्य प्रवाशाची जीवन वाहिनी आहे. महाराष्ट्रातील दररोज लाखो प्रवासी एस.टी.द्वारे प्रवास करत असून त्यांच्या खिशाला ही दरवाढ कदापीही परवडणार नाही. त्यामुळे केलेली दरवाढ ही रह करण्यात यावी.तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्याचे दर परवडत नाहीत. त्यामुळे गाईच्या दुधाला 55 रु. प्रतिलिटर हमीभाव व म्हशीच्या दुधाला रु. 65 प्रतिलिटर हमी भाव देण्यात यावा. खुराकाचे भाव उदा. पेंड, कळणा, सरकी, गोळी पेंड इ. भाव कमी करण्यात यावेत व दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा.

शेतमालाला देण्यात येणारे भाव अत्यंत कमी दराचे असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पिक उदा. तूर, मुग, उडीद, सोयाबीन, कांदा, ज्वारी, गहू योग्य तो हमी भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून शेती मालाला कमी भाव देऊन होणारी लुट थांबवावी.पवनचक्की चालविणाऱ्या कंपनन्याकडून केलेल्या कामाची चौकशी करुन योग्य ती कडक कार्यवाही करावी अशा मागण्या करण्यात आल्या व.रास्ता रोको करण्यात आला यावेळी अनील शेंडगे, दिलीप शाळू, चेतन बोराडे, उमा रणदिवे, अजय कोकाटे आदी उपस्थित होते.

 
Top