तुळजापूर (प्रतिनिधी) - मराठवाड्याला देण्यात येणाऱ्या कृष्णा खो-यातील हक्काचा पाण्याबाबतीत पुढील आठवड्यात मी सविस्तर आढावा विषय समजुन घेणार असल्याचे स्पष्ट करुन, नदीजोड प्रकल्पातुन पिढ्यानपिढ्या दुष्काळ मुक्तीसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवार दि. 3 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर पत्रकाराशी संवाद साधताना केले.
यावेळी पुढे बोलताना विखे म्हणाले कि श्री आई तुळजाभवानी सर्वाचेच दैवत आहे तिने न मागता महायुतीला भरभरुन दिले.भारत वासियांना सुखी समाधानी ठेवण्यासाठी आमच्या नेत्यांना आशिर्वाद दे असे साकडे घातल्याचे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना पाटील म्हणाले की मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्याचे पाणी कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. इतर कामांचा विकास निधी लाडक्या बहीणीसाठी वळवला या प्रश्नाला उत्तर देताना हा गैरसमज असल्याचे सांगुञ प्रत्येक विकास योजना गतीमान तेने चालु असुन जलसिंचन योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे लक्ष असुन यासाठी केंद्र भरीव निधी देणार असल्याचे स्पष्ट केले
लाडक्या बहीण योजनेसाठी निष्कर्ष व अटी नाहीत ही केवळ एक अफवा आहे डिसेंबरचा लाडके बहिणीला हप्ता मिळाला असून तसेच हप्ते चालू राहतील. लाडक्या बहीणाला दिलेला शब्द महायुती बदलणार नसल्याचे सांगितले. आपण धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यास इच्छुक आहेत का असा प्रश्न केला असता यावेळेस पाटील म्हणाले की, हा प्रश्न मुख्यमंत्री यांचा असून ते जी माझ्यावर जबाबदारी देतील त्याला मी स्वीकारेल कारण धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री होणे भाग्याचेच आहे.
बीड जिल्ह्यामध्ये जातीचा राजकारण होत असून मराठा विरुद्ध वंजारी याबाबत आपले मत काय असे विचारणा केली असता जातीचे समीकरण व राजकीय समीकरण ही वेगळे असून जो गुन्हेगार आहे त्याची जात न पाहता त्याला कायदेशीर शिक्षा होणे गरजेचे आहे. यामुळे येथे जातीचा प्रश्न निर्माण होत नाही.गर्दी मुळे आपल्याला दुय्यम दर्जाचे मंञी पद मिळाऱ्यावरुन आपण नाराज असल्याचे बोलले जाते असा प्रश्न केला असता ते म्हणाले कि, गोदावरे कृष्णा खो-यात मोठे काम करण्याची संधी आहे. या मंञीपदाचा माध्यमातून मी वडीलांची स्वप्नपुर्ती करणार असे स्पष्ट केले.