भूम (प्रतिनिधी)- शिवसेना (उबाठा) धाराशिवचे संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी आपला कार्य अहवाल दिनदर्शिकाच्या माध्यमातून उस्मानाबाद-धाराशिव लोकसभा मतदारसंघातील घराघरात पोहोचवला आहे. या दिनदर्शिकेचे वितरण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते भूम या ठिकाणी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांच्या निवासस्थाने केले आहे
लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, शिवसैनिकांची संघटनात्मक आढावा बैठक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार, लोकसभा 2024 निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार असणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा गौरव, महिला आघाडी नियुक्ती कार्यक्रम, मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा यासह धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपन्न झालेल्या.
होऊ द्या.. चर्चा कार्यक्रमाच सचित्र अहवाल दिनदर्शिकाच्या माध्यमातून संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांनी मांडलेला आहे. लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान मतदाना दिवशी बुथ केंद्राच्या परिसरात भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे शिवसैनिकाचा खून झाल्यानंतर हल्लेखोर, गुन्हेगाराला शासन आणि मृत शिवसैनिकाला न्याय मिळावा यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी सुनिल काटमोरे यांनी भेटून केलेली चर्चा देखील दिनदर्शिकातून मांडलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनदर्शिकातील कार्य अहवालाचे अवलोकन करून, प्रकाशन सोहळा कार्यक्रमात कौतुक केले आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत ,अनिल देसाई विश्वनाथ नेरूरकर यांच्यासह धाराशिव जिल्ह्याचे खासदार राजे निंबाळकर, बार्शीचे ज्येष्ठ आमदार दिलीप सोपल, कळंब- धाराशिव मतदार संघाचे आमदार कैलास पाटील, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी यांच्या छायाचित्रांना दिनदर्शिकत मानाचे स्थान दिलेले आहे. उस्मानाबाद-धाराशिव लोकसभा मतदारसंघा मधील 10 तालुक्यासह, ग्रामीण भागामध्ये या दिनदर्शिकाचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केलेले आहे.