धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव येथे विविध खेळ, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, रस्सीखेंच, हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट नियोजन आणि खेळाडूंचा उत्साह पाहायला मिळाला. आज या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. बाळासाहेबांनी खिलाडू वृत्तीनेच आम्हाला राजकारण व समाजकारण करण्याचा मंत्र दिलाय, याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.
शिवसेना जिल्हा संघटक म्हणून धाराशिवमध्ये गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या या स्पर्धेसाठी विशेष लक्ष होते. खेळाडूंसाठी नियोजन व स्पर्धेचा लौकिक जपण्याचं काम संयोजकांकडून झालंय. गेल्या 4 दिवसांपासून घेण्यात आलेल्या या खेळांचा आज समारोप करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख अमरराजे कदम, माजी शहर प्रमुख संजय मुंडे, गणेश जगताप युवा नेते अभीराम पाटील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य भैया पाटील मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे सर व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.