धाराशिव (प्रतिनिधी)- खेड येथे विद्यापीठ उप परिसराचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराला सुरुवात झाली. “माझ्या भारतासाठी तरुणाई“ ही या शिबिराची थीम आहे. या शिबिराच्या उद्घाटनाला खेड गावचे सरपंच श्रसुनील गरड अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून श्रीमती जयश्री पाटील,  वंदना कांबळे, आणि हर्षवर्धन शेलमोहर, क्षेत्रीय कार्यकर्ता, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, धाराशिव यांची उपस्थिती होती. 

तसेच या कार्यक्रमाला कार्यक्रमाधिकारी डॉ. आर. एम. खोब्रागडे, डॉ. जे. एस. शिंदे, डॉ. एम. के. पाटिल, विद्यार्थी तसेच गावाकरी उपस्थित होते. उद्घाटन पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटक तसेच प्रमुख पाहुण्या जयश्री पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी शिबिरा अंतर्गत कशाप्रकारे गावाचे एकरूप होऊन काम करायचे याविषयी माहिती दिली. तसेच बाल विकास व बालसरक्षणावर मार्गदर्शन केले. तसेच स्त्री-पुरुष समानता व मुलींनी व्यवस्थित आहार घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रस्तुत प्रसंगी उपस्थित वंदना कांबळे व हर्षवर्धन शेलमोहर यांनीही मार्गदर्शन केले.  वंदना कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये मुलींनी आपल्या तब्येतीची काळजी त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच महिलांवर कुठे अत्याचार होत असल्यास 1098 या नंबर वर संपर्क करावा. 0 ते 18 वर्षाचे बालके कुठे एकाकी अथवा वाईट अवस्थेमध्ये दिसल्यास तसेच कुठे असल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास विभाग येथे संपर्क साधून सामाजिक जबाबदारी पार पाडावी. तसेच बालविवाह होत असल्यास तात्काळ संपर्क साधावा. हर्षवर्धन शेलमोहर यांनी आपल्या मनोगता मध्ये अनाथ बालके तसेच स्त्रियांसाठी तयार केलेल्या जिल्ह्यातील संरक्षण गृहाविषयी माहिती दिली. गावचे सरपंच सुनील गरड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका विशद केली. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या दोन शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गावांमध्ये झालेल्या कामाचा उल्लेख आवर्जून केला. तसेच या कार्यक्रमांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव व बालविवाह संदर्भात शपथ देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये बाल संगोपन योजना, बालकांसाठी स्वयंसेवी बालगृह, निरीक्षणगृह, बालकल्याण समिती बाल न्यायमंडळ, महिला समुपदेशन कक्ष, शुभमंगल योजना, सखी निवास शक्ती सदन, महिला लोकशाही दिन, वन स्टॉप सेंटर, अनाथ प्रमाणपत्र, हुंडा प्रतिबंधक अधिनियम याविषयी माहिती पॉम्पलेट द्वारे देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार डॉ. जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा देशमुख यांनी केले.


 
Top