धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे ) पुरुस्कृत कामगार सेना आणि वडार सेने तर्फे छत्रपति शिवाजी महाराज चौकात असलेल्या नूरानी इस्लामिक ख़ानावळ बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया समोर लहू घोड़के यांनी आमरण उपोषण सुरु करूण 3 दिवस उलटले तरीही कोणताही अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही.
तसेच या विषयात जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल असे युवासेना धाराशिव जिल्हा सरचिटणीस निखिल घोड़के यांनी ठणकावून सांगीतले. यावेळी (युवासेना -शिवसेना) कामगार सेना जिल्हा प्रमुख राहुल चव्हाण, जिल्हा सचिव गणेश साळुंखे, श्रीकांत इटकर, संतोष घोडके, गणेश साळुंके, तानाजी जाधव, अकुश घोडके, दिपक यमपुरे, मनोज अलकुंटे, शेखर साखरे, ओमकार बांगर समवेत हिन्दू समाज बांधव मोठ्या संखेन उपस्तिथ होते.