धाराशिव (प्रतिनिधी)-  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी. फार्मसी इन्स्टिट्यूट, धाराशिव  या महाराष्ट्र शासन अनुदानित कॉलेजचे प्राचार्य गोरख विश्वनाथ देशमाने यांनी  प्रा. डॉ. शशिकांत ढवळे, प्र. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी क्षेत्रातले “केमिकल मॉडिफिकेशन ऑफ नॅचरल पॉलिमर फॉर फार्मास्युटिकल ॲप्लीकेशनस“ या विषयातील  संशोधन करून सादर केलेला  पीएच.डी. प्रबंध 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड' व्दारा रितसर परिक्षा प्रक्रियानंतर गोरख देशमाने यांना “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ( पीएच.डी.) “ फार्मसी विषयातील पदवी विद्यापीठ परिपत्रकाव्दारे जाहीर केली होती. त्यांना दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी आयोजित पदवीदान समारंभात डॉ. मनोहर चासकर कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे होते.

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवच्या वतीने प्राचार्य डॉ. गोरख देशमाने यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांचे हस्ते करून गौरव उद्गार काढले. यावेळी संस्थेच्या सचिव प्रेमाताई पाटील व मुख्य प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील आदी उपस्थित होते. 

 
Top