नळदुर्ग (प्रतिनिधी)- अंगणवाडी उघडण्याची वेळ सकाळी साडे नउची असताना सकाळी सव्वा दहा वाजता अंगणवाडी उघडली जात असल्याने संबंधीत अंगणवाडी शिक्षीकेवर संबंधीत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी यावी अशी मागणी मैलारपूर तांडा येथील नागरीकांनी केली आहे.
मैलारपूर तांडा येथे अंगणवाडी चालविली जात आहे, संबंधीत शासनाच्या विभागाकडून या अंगणवाडी वर निंयत्रण आहे. दरम्यान या ठिकाणी या अंगणवाडी मध्ये शिक्षीका आहे ती शासकीय वेळेचे पालन न करता, दररोज केव्हाही सकाळी दहा ते साडे दहा च्या सुमारास ही अंगणवाडी त्यांच्याकडून उघडण्यात येते. दरम्यान शुक्रवारी दि. 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी सव्वा दहा वाजता अंगणवाडी उघण्यात आली. पालकांनी या ठिकाणी तीव्र आक्षेप घेतला. अंगणवाडी उघडण्याची वेळ सकाळी साडे नउची आसताना शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवून संबंधीत अंगणवाडी शिक्षीका ही सकाळी सव्वा दहा वाजता अंगणवाडी उघडून विद्यार्थ्यांना आत बसविण्यात आले. दरम्यान या प्रकाराबददल पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून संबंधीत शिक्षीकेवर तात्काळ अंगणवाडी विभागाच्या संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी मैलारपूर येथील नागरीकांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात या विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. शिवाय अंगणवाडी ही सकाळी साडेनउ वाजता उघडण्याची वेळ आहे असे समजले. त्यामुळे अंणवाडी विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून मैलारपूर तांडा येथील नागरीकांच्या मागणीकडे लक्ष देवून तात्काळ या प्रकरणी संबंधीत दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.