तुळजापूर (प्रतिनिधी)- कर्नाटकातील बिदर येथील भाविक पांडुरंग हुलाजीराव पाटील यांनी तुळजाभवानी देवीस 47.94 ग्रॅम वजनाची (सुमारे 3.5 लाख किमतीची) सोन्याची साखळी अर्पण केली. 

मंदिर संस्थांतर्फे त्यांचा साडीचोळी आणि देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे विश्वास कदम, गणेश मोटे, राकेश पवार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

 
Top