धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा पत्रकार संघ संलग्न असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील पत्रकार संघाच्या विस्तारित कार्यकारणीस जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख व सरचिटणीस भिमाशंकर वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. येरमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून सचिन राजेंद्र बारकुल, उपाध्यक्ष म्हणून दिपक लिंबराज बारकुल तर सचिवपदी दत्तात्रय दिलीप बारकुल हे काम पाहतात.
उर्वरित कार्यकारणीत कोषाध्यक्षपदी सुधीर शिवाजीराव लोमटे,कायदेशीर सल्लागार मिलींद चंद्रकांत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख सुखदेव लक्ष्मण गायके, सदस्य म्हणून कल्लेश मल्लेश भोसले, बालाजी रमेश बारकुल, संतोष विष्णु बारकुल, तानाजी उत्रेश्वर बारकुल, सतिष सुरेश पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून बाळासाहेब शिवाजी जाधवर, दत्तात्रय कोंडीबा गायके यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागात असूनही येरमाळा पत्रकार संघाने आदर्शवत काम सुरू केलं आहे. त्यामुळं त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.