धाराशिव (प्रतिनिधी)-- शहरातील श्रीपतराव भोसले मध्ये इ. ५ वी ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा २६ जानेवारी निमित्त क्रीडा सप्ताहातील विविध क्रीडा प्रकाराचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील , संस्था सदस्य संतोष कुलकर्णी उपप्राचार्य संतोष घार्गे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , पर्यवेक्षक यशवंत इंगळे, राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले आहे . या प्रसंगी पर्यवेक्षक सुनील कोरडे, डॉ. विनोद आंबेवाडीकर , धनंजय देशमुख , निखिल गोरे , शिक्षकशिक्षिका वृंद उपस्थित होते.