तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील सर्वात पाहिलं ज्ञानमंदिर असलेली एकमेव जिल्हा परिषद प्रशालेच्या 1975 च्या बॅचचे वयोवृद्ध वर्गमित्र एकत्रित येत आनंदी
स्नेहमेळावा आयोजित करून आयुष्यातील सुख दुःखाचे क्षण एकमेकांशी हितगूज करत उर्वरित आयुष्यात मानसिक आधार देण्याची शपथ घेऊन साजरा केला.
श्रीनाथ मंगल कार्यालय येथे विश्वनाथ पुजारी यांच्या संकल्पनेतून तब्बल पन्नास वर्षांनी जेष्ठ वर्गमित्र एकत्रितपणे एका ठिकाणी येत सामूहिक संवादासह शालेय गप्पांची मैफिल रंगली होती.
याप्रसंगी प्रत्येक वर्गमित्रांनी सर्वप्रथम परिचय देत आजची वैयक्तिक व्यवसायिक स्थिती व कौटुंबिक माहिती सांगितली.शालेय जीवनातील जुन्या आठवणी व गमतीजमती आपल्या संवादातुन उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ पुजारी, सुदर्शन पांढरे,शहाजी रोचकरी,आनंत कोंडो,विनोद खपले,गोपाळ कावरे,नवनाथ पुजारी,नरेश पेंदे, संपत जळके,आयुब शेख,दत्ता शित्रे,आंबादास औटी,प्रदीप पाटील,राजाभाऊ साळुंखे,नागनाथ वाघ,लाईक सिद्धिगी,अरविंद नडमने,शिवाजी कापसे,अनिल भांजी,प्रमोद देशमुख,डॉ.महादेव पाटील,दिलीप कदम,धनंजय हुंडेकरी आदींनी परिश्रम घेतले.