तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ  येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सरत्या वर्षात तब्बल 47 कोटी 27 लाख 32 हजार 206 रुपये  भाविकांकडुन विविध रुपात उत्पन्न प्राप्त झाले.

श्रीतुळजाभवानी भक्तांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक गर्दी ही श्रावण मास ते दीपावली या कालावधीत झाली. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपुर्ण आद्य शक्तिपीठ असलेल्या श्रीतुळजाभवानी मातेच्या  दर्शनाला वर्षभरात कोट्यवधी भाविक येत असतात. यात  कर्नाटक, आंध्र, तेलगंना, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा  या ठिकाणच्या भक्त ही मोठ्या संखेने आले होते. विशेष म्हणजे सर्वजाती धर्म पंथ चे भक्त आले होते. यात मुस्लिम धर्मिय देविभक्तांची संख्या लाखोचा घरात आहे.

कोरोना नंतर धार्मिक  देवस्थानचे महत्त्व जगभर पोहोचल्यामुळे भक्त संख्याही कोटीच्या वर पोहोचली आहे. देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत अंदाजे दीड  कोटी 25 लाख भाविक श्रीतुळजाभवानी चरणी लीन झाले आहेत. केवळ दर्शनच नाही, तर यातील हजारो भाविकांनी श्रीतुळजाभवानी मातेला भरभरून दान अर्पण केले. 30 डिसेंबरपर्यंत देवस्थान समितीने या दानाची मोजदाद केली असता,  एकूण 47 कोटी 27 लाख 32 हजार 206 .09 रुपये किमती  इतके उत्पन्न मिळाले.

देणगी दर्शन -16.96,41,200 रुपये, सिंहासन पेटी 12,61,90,220.00 रुपये, दानपेटी 6,64,64,870,00 रुपये, विश्वस्त निधी उत्पन्न  3,63,91,938 रुपये, देणगी दर्शन (युपीआय) 2,95,70,711 रुपये, भरती परिक्षा फीस 90,86,800 रुपये, धनादेश देणगी 72,09,175 रुपये, आँनलाईन देणगी 64,06,491.70 रुपये, अभिषेक पुजा फिस 56,65,180.44 रुपये, गुप्तदान पेटी 49,04,080 रुपये, आँनलाईन देणगी आयसीआयसीआय 31,04,175.95 रुपये, आँनलाईन देणगी बँक खाते 19,47,718 रुपये, सिंहासन श्रीखंड पुजा 18,25,824 रुपये मनीआँर्डर 8,57,405.00 रुपये, ढोळेटीळे कवडी व इतर 3,01,500 रुपये, गोंधळ लमाण जावळ 2,51,130 रुपये, नगद अर्पण 2,11,344 रुपये, आराध फिस 1,61,117 रुपये,  फोटो सेल 1,46,442.74, तांबे पितळ वस्तु अर्पण 75,562.50 रुपये, प्राणी अर्पण 62,840.00 रुपये, शिधा 41,690 रुपये सिंहासन दही  27,030 रूपये, निवासस्थान भाडे, 631.00 रुपये, कल्लोळ स्वच्छता 14,050.92 रुपये व इतर व इतर बाबीचे उत्पन्न 47 कोटी 27 लाख 32 हजार 206 रुपये उत्पन्न मिळाले आहे.

 
Top