धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा स्तरीय सनियंत्रण व समन्वयक दिशा समिती सभेच्या आढावा बैठकीचे आयोजन दि. 06/01/2025 रोजी खा. ओमप्रकाश
जेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर आढावा बैठकीमध्ये विविध विषयाचा आढावा घेण्यात येणार असून सदर बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परीसर धाराशिव येथे दु. 12.00 वा. होणार आहे.
या आढावा बैठकीमध्ये रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य् कार्यक्रम, डिजीटल इंडीया अंतर्गत भुमी अभिलेखाचे संगणकीकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, दिनदयाळ अंत्योदर योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, खरीप पिक कर्ज वाटप आदी योजनेसह विविध विभागातील महत्वपुर्ण योजनेचा आढावा देण्यात येणार आहे.