मुरूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025  दरम्यान सुरू झाला आहे. या उपक्रमांचा शुभारंभ उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रदर्शनाने झाला.

आधुनिक पिढी घडण्यासाठी वाचन  चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने हाती घ्यावे. शहरातील आणि गावातील ग्रंथालय आणि युवकांनी शासनाचा वाचन संकल्प यशस्वी करण्यास पुढाकार घ्यावा. असे आवाहन आमदार स्वामी यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त 1 ते 15 जानेवारी दरम्यान  या उपक्रमांतर्गत ग्रंथालय आणि वाचक  याना  जोडण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी,  प्राध्यापक आणि सर्वसामान्य लोकांसाठी केले जाणार असल्याचे प्रतिपादन  वाचन संकल्प  महाराष्ट्र उपक्रमाचे विद्यापीठ नियुक्त धाराशिव जिल्हा समितीचे  सदस्य, प्राचार्य डॉ. संजय अस्वले यानी केले आहे.

या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक पुस्तक वाचन, पुस्तक लेखन आणि कथन स्पर्धा, लेखक-वाचक कार्यशाळा आणि बक्षिस वितरण व समारोप असे विविध उपक्रम महाविद्यालय आणि गावा-गावा मध्ये राबविण्यात येणार आहेत.   ग्रंथालयाच्या वतीने दुर्मिळ अशी संस्कार, मूल्य  रुजवनारी  ग्रंथ, पुस्तके प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी ग्रंथपाल डॉ बी. व्ही चालुक्य, एस एस जगताप यानी पुढाकार घेतला. यावेळी उपप्राचार्य डॉ. व्ही एस  इंगळे, प्रा. जी एस मोरे, प्रा. एस ए. महामुनी, प्रा. व्ही. एन. हिस्सल समितीचे सदस्य उपप्राचार्य डॉ. पी. ए. पीटले, डॉ. व्ही. डि. देवरकर, डॉ. एस. पी. इंगळे, डॉ. जी एन सोमवंशी, डॉ. डि. एस चितमपल्ले, डॉ चालुक्य आदींची उपस्थिती होती.


 
Top