धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय दुसरी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन मौजे घाटंग्री परिसरातील तगर भुमी बुध्द विहार येथे संपन्न झाली. या धम्म परिषदेसाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. यामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यात आली होती, शासकीय ॲम्बुलेंसची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य सेवा दिल्याबद्दल डॉ. संघर्षा सोनटक्के, रक्त संक्रमण अधिकारी विठ्ठल कांबळे, आरोग्य सेवक विजयकुमार मजगे यांचे तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती व ईथीकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे यांनी स्वागत करुन आभार मानले. यावेळी तालुकास्तरीय बाल संरक्षण समिती व इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे,रमेश कांबळे,अमोल लष्करे, सिद्राम वाघमारे,भाऊसाहेब अणदुरकर,सुनील वाघमारे,प्रमोद नागटिळक सह इतर उपस्थित होते.

 
Top