नळदुर्ग  (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता (बायपास) येत्या 26 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 च्या दरम्यान एकेरी वाहतुकीसाठी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे या कामाचे स्ट्रक्चर इन्चार्ज ओमप्रकाश श्रीवास्तव यांनी बोलताना सांगितले.

नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता (बायपास) गेल्या दहा वर्षापासून रखडला आहे, अनेक ठेकेदार हे काम सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे हा वळण रस्ता होणार की नाही याबाबत शंका निर्माण होत होती. मात्र गेल्या सहा महिन्यापासून एस यू सी या कंपनीने ही काम हाती घेतले असून त्यांनी बायपास रोडचे काम वेगाने सुरू केले आहे. या बायपास वर बोरी नदीवरील एका मोठ्या पुलासह तीन लहान पुल व तुळजापूर रस्त्यावरील उड्डाणपूल असे कामे करण्याबरोबर रस्त्याचे कामे ही बाकी होते. एकंदरीत सहा ठेकेदार हे काम सोडून गेल्यामुळे ही काम होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र गेल्या सहा महिन्यापासून एस यू सी कंपनीने ही काम करण्यास सुरुवात केली आहे. लहान सहान पुला ची कामे पूर्ण होत आली आहेत तर बोरी नदी वरील मोठा पूल ही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे या वळण रस्त्यावरून एकेरी वाहतूक करण्यासाठी संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. येत्या 26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान केव्हाही हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा रस्ता लवकर चालू झाला तर नळदुर्ग च्या घाटातील सध्या होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे व अपघातामुळे होणारे मृत्यू ही टळणार आहेत. बायपास रस्ता होत नसल्यामुळे आणि नळदुर्ग च्या घाटातील राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे व साइड पट्ट्याचे काम झाले नसल्याने गेल्या दहा वर्षात शेकडो नागरिकांचा प्राण या रस्त्याने घशात घातला आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्षा मुले अनेक तरुण या रस्तावर अपघातात मरण पावले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता चालू होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे आता मैलारपुर येथील श्री खंडोबा मंदिराच्या दक्षिण बाजूने जाणारा हा बायपास रस्ता एकेरी वाहतुकीसाठी सुरू होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 
Top