धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत.परंतु धाराशिव जिल्ह्याला एक ही इलेक्ट्रिक बस देण्यात आली नव्हती. याच अनुषंगाने परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे धाराशिव जिल्ह्यासाठी 100 इलेक्ट्रिक बसेसची मागणी शिवसेनेचे युवा नेते आनंद पाटील यांनी केली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना धाराशिव जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात वीस इलेक्ट्रिक बस देण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना युवा नेते आनंद पाटील यांच्या पहिल्याच मागणीस यश मिळाले आहे.
धाराशिव येथील शिवसेना युवा नेते आनंद पाटील यांनी मंगळवार 21 जानेवारी रोजी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची यांची भेट घेतली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी आनंद पाटील यांनी मंत्री सामंत यांना धाराशिव जिल्ह्याला 100 इलेक्ट्रिक बस देण्याची मागणी केली. धाराशिव जिल्हयातील अंतर्गत वाहतुकीने धाराशिव शहर हे लोकांनी गजबजलेले शहर आहे. रोज धाराशिव शहरात आजुबाजुच्या खेडेगावातुन हजारो लोकांची शहरात ये-जा होत असते. यासाठी खेडे गावातील लोक हे परीवहन विभागाच्या गाड्यांचा जास्तवापर करत असतात.
त्यामुळे जिल्ह्यात अंतर्गत वाहतुकीसाठी चांगल्या बसेसची आवश्यकता आहे. त्या तुलनेत धाराशिव परिवहन विभागाच्या ज्या बसेस आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आणि खराब आहेत. परिवहन विभागाच्या बसेस या कित्येकदा रस्त्या मध्येच बंद पडलेल्या आढळतात.त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास व मनस्ताप हा प्रवाशांना होताना दिसत असतो .
तसेच बसचे चालक-वाहक यांनाही या वाहन सततच्या बंद पाडण्याचा त्रासाला सामोरे जावे लागत असते. बऱ्याच वेळेस प्रवासी हे खाजगी वाहनांना प्राधान्य देतात. खाजगी वाहनांमुळे अपघातही होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे धाराशिव परिवहन विभागाला 100 इलेक्ट्रिक बसेस देण्यात याव्यात अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे निस्सीम भक्त आहेत. पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याला एकही इलेक्ट्रिक बस मिळालेली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापक संचालक यांना धाराशिव जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात वीस इलेक्ट्रिक बसेस देण्याचे निर्देश दिले असल्याचे युवा नेते आनंद पाटील यांनी सांगितले.
या स्नेहमेळाव्यात स्नेहभोजनानंतर एकमेकांना तिळगुळ वाटप करून कार्यक्रमाची गोड सांगता झाली.