तुळजापूर (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रयत्नातुन  तिर्थक्षेञ तुळजापूर येथील अग्निशामक सेवा बळकटीकरणसाठी  नगर परिषद तुळजापूरला 1 कोटीचे अग्निशामन वाहन देण्यात आले.

तिर्थक्षेञ  तुळजापूरात देवीदर्शनार्थ  दररोज लाखो भाविक देवी दर्शनासाठी येत असतात. शहराची वाढती लोकसंख्या पाहता तसेच शहराच्या बाह्य ठिकाणी हद्द वाढ भागामध्ये सद्य परस्थितीला मोठ्या प्रमाणा मध्ये नव्याने बांधकाम कामे होत आहेत. तसेच शहरातही नव्याने उंच अशा इमारतीचे बांधकाम होत आहेत. पूर्वी एक अग्निशामन वाहन होते ते सद्य परस्थितीला जुने झाल्यामुळे त्याची आपत्कालीन वेळेस सेवा सुरळीत होत नसे या कारणास्तव अद्ययावत अशी नविन अग्नीशामन वहान गाडीची व्यवस्था आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शासन दरबारी प्रयत्न करुन  नगर परिषदच्या माध्यमातुन शहरास नविन अग्नीशामन गाडी उपलब्ध करुन दिली. सदरील नविन अग्निशामन वाहन हे अंदाजीत 60 फुट उंची पर्यंत पाण्याचा फवारा मारु शकते. तसेच अत्याश्यक सेवा म्हणुन सदरील अग्निशामन वाहनामुळे शहर तथा तालुक्यातील सूविधा उपलब्ध होणार आहे. सदरील अग्निशामन वाहणाचे पौष पोर्णिमे दिनी महाद्वारी महंत वाकोजी महाराज यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शहराध्यक्ष शांताराम पेंदे ,नरेश अमृतराव, अविनाश गंगणे, औदुंबर कदम, शुभम क्षिरसागर,नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक पाठक,अग्निशामन कर्मचारी देवकते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top