उमरगा (प्रतिनिधी)- पुस्तके आपणास मानवी जीवनात सकारात्मक जगण्याची उमेद देतात. जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी वाचण्याचे विविध माध्यम उपलब्ध आहेत. मात्र आपण काय वाचतोय आणि त्यातुन मिळणारी ऊर्जा याबाबतची प्रत्येकात प्रगल्भता असली पाहिजे. वाचन चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे. संविधानाचे अनुपालन आणि समताधिष्ठित समाज रचना महत्त्वाची आहे. असे मत तृतीय पंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण समारंभ रविवारी (दि. 29) शहरातील ओम साई मंगल कार्यालयात झाले. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख बोलत होत्या. आमदार प्रवीण स्वामी, शिवसेनेचे नेते केशव उर्फ बाबा पाटील, कैलास शिंदे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, रज्जाक अत्तार, हरिष डावरे, राम गायकवाड, संजय पवार, ॲड. मोहनराव कोथिंबरे, बरगली बेडदुर्गे, प्रा. सुनिता चावला, शांताबाई शामराव चव्हाण, उद्धवराव गायकवाड, रमेश माने आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.
“देश व राज्यातील लोक दशहतीच्या वातावरणात जगताहेत. घाणेरड्या राजकारण्यांमुळे लोकशाहीचे अवमुल्यन होण्याचा प्रकार घडतोय. सत्ताधिशांना वठणीवर आणण्यासाठी चांगल्या विरोधकांची गरज आहे. असे सांगुन दिशा शेख यांनी संविधानामुळे सर्वांना अधिकार प्राप्त झाल्याने संविधानाचा आदर केला पाहिजे. पुस्तकी वाचनाबरोबरच ऑडिओ - व्हीडीओ वाचनालयातुन लोकांना प्रेरणा मिळेल, त्याची सुरवात झाली पाहिजे असे आवाहन केले. आमदार स्वामी यांनी ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशन व वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतूक केले. या वेळी पुरस्कारार्थी विनायकराव पाटील, प्रा. सुरेश बिराजदार, धम्मचारी प्रज्ञाजित, भावना नान्नजकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजक ॲड. शीतल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष प्रा. राजु बटगीरे, सत्यनारायण जाधव, श्रीमती अनुराधा पाटील, अँड. सयाजी शिंदे, माधव चव्हाण, किशोर औरादे, करीम शेख, अँड ख्याजा शेख, ॲड. अर्चना जाधव, व्यंकट भालेराव, धानय्या स्वामी, शशीराज पाटील, केशव सरवदे, प्रदिप चौधरी, विजय चितली, किशोर बसगुंडे यासह ॲड. शीतल चव्हाण फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सुधीर कांबळे यांनी सूत्रसंचलन केले तर सत्यनारायण जाधव यांनी आभार मानले.
या मान्यवरांचा पुरस्काराचा झाला गौरव
जेष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांना जीवनगौरव, धम्मचारी प्रज्ञाजित यांना समाजरत्न, आयुब कादरी यांना पत्रकाररत्न, प्रा. सुरेश बिराजदार यांना सहकाररत्न, शिक्षिका भावना नान्नजकर शिक्षकरत्न, शिवप्रसाद लड्डा यांना उद्योगरत्न, अर्जुन व आर्यन, तानाजी बिराजदार यांना क्रीडारत्न, कस्तुरबाई चव्हाण यांना ग्रंथसेवा, नारायण गोपा चव्हाण यांना कृषिरत्न तर श्रीकांत भराटे यांचा उत्कृष्ट वाचक म्हणुन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.