धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे  सदस्यता अभियान संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने राबवले जात आहे. या अभियानाच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यासाठी नवी जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. भाजप प्रदेश कार्यालयाकडून धाराशिव जिल्हा संयोजक पदी इंद्रजीत देवकते यांची निवड करण्यात आली आहे.

सहसंयोजक म्हणून श्रीमती मीनाताई सोमाजी, विक्रांत संगशिट्टी, सुदाम पाटील, आणि मकरंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल मिडिया प्रतिनिधी म्हणून श्किशोर तिवारी, तर आयटी सेल प्रतिनिधी म्हणून जगदीश जोशी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून या सर्वांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. धाराशिव जिल्ह्यात भाजप सदस्यता अभियानाला आता आणखी बळ मिळणार आहे. या निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top