धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्या मोकाट फिरत आहे. अशा बातम्या मिडीयातुन पाहतो ऐकतो. परंडा, भुम, तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात तर शहरी भागातील मानवी वस्तीत आढळला जात असुन अनेक ठिकाणी त्याने जनावरे सह मनुष्यावरती जीव घेणा हल्ला केला आहे. दररोज कुठे न कुठे तो दिसत असुन यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शालेय विद्यार्थी ग्रामीण भागातुन शिक्षणासाठी शहरात तथा दुस-या ठिकाणी जाणे येणे करतात. लहान मुलांसह पालक मोटार सायकल वरुन प्रवास करतात. बिबट्या हा हिंस्त्र प्राणी असुन त्यापासून नागरिक व पाळीव जनावरे यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. मानवी वस्तीत मोकाट फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करुन धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे आणि आपल्या विभागाकडून नागरिकांत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. अशी विनंती लेखी निवेदनातुन सामाजिक कार्यकर्ते तथा बाल संरक्षण समिती सदस्य गणेश वाघमारे यांनी विभागीय वन अधिकारी यांच्या कडे केली आहे. याची एक प्रत जिल्हाधिकारी यांना देण्यात आली.नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये असेही आवाहन गणेश वाघमारे यांनी केले आहे.