धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा दिवसेंदिवस नोकरीतील संधींचा आलेख वाढत असून, नुकत्याच येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी या विभागातील दोन विद्यार्थिनींची सरळ सेवा भरती अंतर्गत जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रगती बिभीशन सिरसट आणि श्रद्धा राजकुमार सोमवंशी या दोन विद्यार्थिनींची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झालेले आहे. 

मागील दोन वर्षांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापत्य विभागाचे 20 पेक्षा अधिक विद्यार्थी जलसंपदा, पंचायत  समिती बांधकाम विभाग, नगरपरिषद अशा विविध शासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यावर निवडून आज चांगल्या प्रकारे कार्य करत  आहेत. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगल्या हुद्द्यावर शासकीय सेवेत निवड व्हावी म्हणून महाविद्यालयाकडून व तसेच ट्रस्ट अंतर्गत तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या यशाबद्दल नुकताच महाविद्यालयाच्या वतीने दोघींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.शितल पवार, प्रा.व्ही व्ही कोकाटे, प्रा. अमृता पिंपळे, सहाय्यक ग्रंथपाल बिबीशन सिरसट, प्रा.ए. ए. कदम, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.  या दोन विद्यार्थिनींच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे यांनी दोघींचे विशेष अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 
Top