तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे भातंब्री येथील सर्वे नं. 22,23,26 च्या सर्वे नंबर गट नं.60 व 59 च्या बांधावरील गाव जोड रस्ता क्रं. 183 जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख व उपअधिक्षक भूमि अभिलेख'यांनी गिळकृत केला आहे. त्यांच्या मनमानी कारभारास कंटाळुन दि.24 डिसेंबर 2024 रोजी  मंत्रालयासमोर आत्मदहन  करण्याचा इशारा शिवाजी गोरोबा दांगट व इतर रायखेल ता. तुळजापुर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवुन दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, मी वरील गावचा रहिवासी असुन गेले 5 ते 6  वर्षे झाले आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे आम्ही सर्व शेतकरी वर्ग न्याय मिळण्यासाठी आत्मदहण करीत आहोत.  तरी मुख्यमंत्री यांनी लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांनी लाच खावुन शासनाची व शेतकऱ्याची फसवणुक केली आहे. अशा महाशयांना कायमस्वरुपी घरी पाठवावे व त्यांच्यावरती दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात यावे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  या प्रकरणामधील दोषीवरती कार्यवाही होणे गरजेचे आहे असे निवेदनात म्हटले आहे.


 
Top