तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा सेवक सरपंच स्व. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. त्याचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाज तुळजापूर तालुका यांच्या वतीने शनिवार दि. 14 डिसेंबर तिर्थक्षेञ तुळजापूर मराठा समाज बांधवांची बैठक होवुन यात सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी जुने बसस्थानक समोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय झाला.
प्रथमता मराठा सेवक सरपंच स्व. संतोष देशमुख यांना तुळजापूर तालुका सकल मराठा समाजा वतीने भावपुर्ण श्रंध्दाजली अर्पण करण्यात आली. या बैठकीत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना तुळजापूर तालुका, शहर बंद करण्याबाबतीत मते मांडले असता देशातुन भाविक श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ येतात. त्यांना याचा त्रास होवू नये म्हणून बंद न करता तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे प्रथमता रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर पुन्हा आंदोलन कुठल्या पध्दतीने करावयाचे यावर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले.
स्व संतोस देशमुख याचे मारकरी व हत्येचा सुत्रधार मास्टर माईड मग तो कितीही मोठा असो त्याला शिक्षा होईपर्यत संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे मराठा समाज बांधवावर असे भ्याड हल्ले केले तर त्यास राज्यात त्यांना त्यांचा भाषेत समजेल असे उत्तर देण्याचे ठरले. या बैठकीस शहरातील सकल मराठा बांधव सहभागी झाले होते.