भूम (प्रतिनिधी)- संपूर्ण तालुक्याचे ग्रामदैवत श्री क्षेत्र आलम प्रभू देवस्थान येथे सायंकाळी 5 : 59 वाजता रोहिणी नक्षत्रावर 21 ब्रह्मवंधांच्या उपस्थितीत फुले उधळून आलम प्रभू तीर्थक्षेत्रावर दत्त जयंती सोहळा उत्साहात पार पडला.
दुपारी चार पासून ब्रह्मवंदांच्या उपस्थितीत मंत्र उपचाराने आलम प्रभूच्या समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भावी भक्त उपस्थित होते .जन्मोत्सव नंतर जोरदार आतिषबाजी करण्यात आली. यानंतर महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला .भाविकांची संख्या पाहता पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच भूम मध्ये दत्त जयंती उत्सव ठिक ठिकाणी साजरा करण्यात आला. कसबा विभागातील केशवराज मंदिरात सकाळी सकाळी श्रींच्या मूर्तीस महा लघु रुद्राभिषेक यानंतर महादेव मंदिर भजनी मंडळ 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम होऊन बारा वाजता फुले उधळूण व पाळणा म्हणून, आरती करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच बारबोले यांच्या निवासस्थानी धाकटी वेस भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होऊन दत्त जयंती साजरी करण्यात आली. शहरातील एसटी डेपो आगारात दत्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले.