तुळजापूर (प्रतिनिधी) - काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अणदूर निवासस्थानी भेट घेऊन तब्यतेची आस्तेवाईक पणे विचारपूस केली. या तब्येत विचारपुस भेट तालुक्यातील राजकिय पटलावर चर्चचा विषय ठरत आहे. याला कारण विधानसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेस पक्षात घडलेल्या मोठ्या घडामोडी कारणेभूत आहे. यावेळी सुमारे दहा ते पंधरा मिनीटे आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार मधुकर चव्हाण व त्यांचे पुञ सुनिल चव्हाण यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याचे समजते.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरीषद निवडणुक पार्श्वभूमीवर तब्येत विचारपुस भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही भेट तालुक्याच्या राजकारणाच्या आगामी काळात दिशा ठरविणारी तर ठरणार नाही ना असा प्रश्न उपस्थितीत होवू लागला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार मधुकर चव्हाण हे पारंपारिक विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वी माजी आमदार मधुकर चव्हाण यांचे पुञ सुनिल चव्हाण भाजपवासी झाले. त्यामुळे या दोन्ही आजी-माजी आमदारांचा तब्येत विचारपूस भेटीला मोठे महत्त्व आले आहे. या भेटी दरम्यान फक्त तब्येत विचारपूस झाली का आणखी कुठल्या विषयावर चर्चा झाली हे माञ बाहेर येवु शकले नाही.
आमदाद राणाजगजितसिंह पाटील यांनी तब्बेत विचारपूस भेट माध्यमातून आगामी निवडणुक तयारी तर सुरु केली नाही ना अशी चर्चा होत आहे. सदिच्छा विचारपूस भेट कि राजकिय भेट हे आगामी काही काळात स्पष्ट होणार आहे. यावेळी तुळजाभवानी मंदिर आणि एकंदरीत तुळजापूर तालुक्यात सुरु असलेल्या विकासकामांची माहिती चव्हाण यांना दिली. चव्हाण नेहमीच तुळजापूरच्या विकासाबाबत आग्रही राहिले आहेत. त्यांचाच विकासाचा वारसा आपण पुढे नेत आहोत. असे भेटी बाबतीत चर्चा झाल्याचे सांगितले. यावेळी सुनील चव्हाण, नानासाहेब चव्हाण, दीपक आलुरे, साहेबराव घुगे यांच्यासह अणदूर व परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.