तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरळा (खुर्द), आरळी (बु),  काळेगाव रस्त्याची ग्रामस्थांनी वर्गणी करुन दुरुस्ती करुन ही पुन्हा या रस्त्याची प्रचंड    दुरावस्था झाल्याने एस टी ही बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्ती करा  अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटनेने थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे कि , तुळजापूर तालुक्यातील आरळी (खुर्द), आरळी(बु), काळेगाव हा रस्ता गेली कित्येक वर्षे अति खराब झाला आहे. या भागातील नागरीकांना त्या रस्त्यावरून वाहने नेत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच अनेक अपघातही या रस्त्यावर होत आहेत. रस्ता खराब असल्याने येथे एसटी महामंडळाने बस सेवाही बंद केलेली होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुळजापूर येणे अशक्य झाले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी वर्गनी गोळा करुन स्वखर्चातुन रस्त्याची डागडुजी केली होती. हा रस्ता करण्यात यावा म्हणुन बऱ्याच वेळा शासन दरबारी गावकऱ्याकडुन पाठपुरावा केला असता हा रस्ता नकाशावर नाही अशा पध्दतीची उत्तरे या विभागाशी निगडीत असलेले जबाबदार अधिकारी देत असून, काल परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असलेल्या प्रमुख पक्षांच्या लोकांना गावकऱ्यांनी जाब विचारला असता विधानसभा झाल्यानंतर तुमचा रस्ता लगेच होईल अशा पध्दतीचे आश्वासन दिले गेले. आज पावेतो या रस्त्यासाठी कुठलीही शासकिय हालचाल होताना दिसत नसुन. यामुळे या भागातील सर्व नागरीक हैरान झाले आहेत. वैयक्तीक लक्ष घालुन या भागातील या नागरिक जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर रस्ता तयार करुन देवून सहकार्य करावे. अन्यथा स्वराज्य पक्ष वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, सत्यजित साठे, औदुंबर कदम, प्रमोद शिंदे, सागर गायकवाड यांनी दिले.


 
Top