धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची संगणक विभागाची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी  वैष्णवी घोगरे हिची आय. आय. टी मुंबई येथे रिसर्च प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे. इंटर्नशिपचा कालावधी सहा महिने आहे. इंटर्नशिपच्या कालावधी मध्ये 15 हजार रुपये मासिक स्टायपेंड दिले जाणार आहे. 

या कालावधी मध्ये आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ संशोधनाचा अनुभव घेण्याची संधी कु. वैष्णवी हिला मिळणार आहे. आरोग्य संदर्भातील संगणकीय अँप्लिकेशन वर काम करण्याची संधी तिला या मधून प्राप्त झाली आहे.आयआयटी मुंबई येथे देशभरातून विद्यार्थी इंटर्नशिप साठी अर्ज करतात . निवड प्रक्रियेमध्ये अर्जांची प्राथमिक छाननी, त्यानंतर परीक्षा व मुलाखत यांचा समावेश होतो. निवड प्रक्रिया उमेदवारांनी त्यांच्या नियमित शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त केलेल्या शैक्षणिक कामगिरीवर सापेक्ष श्रेणी, महाविद्यालय स्तरावर संशोधन ऍक्टिव्हिटी मध्ये घेतलेला भाग, टेकफेस्ट, ऑलिम्पियाड्स, राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा आणि मुलाखतीमधील कामगिरी यासारख्या स्पर्धांमधील सहभाग यावर अवलंबून असते.तिच्या या यश बद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून जानेवारी मध्ये ती आयआयटी मुंबई येथे रुजू होईल. आयआयटी मुंबईने तांत्रिक स्वावलंबन साध्य करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाशी संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ठोस प्रयत्न केले आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक विज्ञान आणि अभियांत्रिकी च्या महत्त्वाच्या क्षेत्रात संशोधन प्रकल्प राबवतात. कु.  वैष्णवी घोगरे हिच्या निवडीबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने असे म्हणाले  की, महाविद्यालयातील आमचे विद्यार्थी दिवसेंदिवस वेगवेगळ्या क्षेत्रात निवड होत असून त्यासाठी महाविद्यालयाचे व्यवस्थांपण आणि शिक्षक यांचे बहुमोलाचे योगदान आहे. अशाच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थी आय. आय.टी.येथे संशोधन विभागांमध्ये व इतर नवीन प्रोजेक्टमध्ये प्रशिक्षणासाठी जातील असा आम्हाला विश्वास आहे. याप्रसंगी श्री. मेघ पाटील यांनी या मुलीचे कौतुक करून आपल्या  तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा कष्टाळू, गरजवंत व हुशार विद्यार्थ्यांना सदैव तेरणा युथ फाऊंडेशन मदत करेल असे प्रतिपादन केले.

 तिच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, मेघ पाटील, व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अशोक जगताप, महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन करून तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top