धाराशिव/ भूम (प्रतिनिधी) - संविधानाचा अवमान करणाऱ्या दोषींवर व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा व शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 50 लाखाची आर्थिक मदत करा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू कारणीभूत असलेल्या पोलिसांवर निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे तर भूममध्ये उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. सध्या देशात आणि राज्यात धर्मांध व जातीयवादी विद्वेषाचा प्रचार व प्रसार करुन कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम होत आहे व सरकारकडुन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसुन येत नाहीत. उलटपक्षी अशा दोषींना पाठब देण्याचे काम होत असताना दिसत आहेत. यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिंमत वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून दि. 10 डिसेंबर 24 रोजी परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिमेचे अवमान व नासधूस करण्याची संतप्त घटना घडली आहे.
निवेदनावर पृथ्वीराज चिलंवत, रवीराज माळाळे, सिध्दार्थ बनसोडे, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, उदय बनसोडे, गणेश वाघमारे तर भूम येथे भागवतराव शिंदे मराठवाडा उपाध्यक्ष आरपीआय आठवले, मुकुंद लगाडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, हनुमंत सोनवणे, महावीर बनसोडे, हनुमंत सोनवणे, एड. शुभम पालखे, यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.