भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्याचे ग्रामदैवत मानले श्रीक्षेत्र आलमप्रभू देवस्थान येथे  दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आलम प्रभू देवस्थान मंडळ व येथील भगवंत ब्लड सेंटर बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 14 रोजी करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 65 बहाद्दरांनी रक्तदान केले. 

यावेळी अलंप्रभु देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप शाळू , बाळासाहेब हुरकुडे, संजय शाळू, रवी टेकाळे, शिवलिंग शेंडगे, हरिश्चंद्र पवार, सुधाकर फुसके, श्रीकांत दीक्षित यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून श्रीक्षेत्र आलम प्रभू देवस्थान मंडळाच्या वतीने रक्तदानाचा सामाजिक संदेश देत एक आदर्श घालून दिला आहे. तालुक्याचा जिल्हाभरात ठिकठिकाणी विविध देवस्थानचे यात्रा जत्रा महोत्सव साजरे करण्यात येतात. या ठिकाणी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. मात्र भूम येथे प्रथमच श्रीक्षेत्र आलम प्रभू देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये रक्त रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला होता. अनेक रुग्णांना रक्तपुरवठा मागणीच्या तुलनेत होऊ शकत नव्हता. त्यामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप शाळू यांनी रक्तपेढीचे संचालक गणेश जगदाळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ या समाजकार्यास होकार  देत या रक्तदान शिबराचे आयोजन केले .यावेळी भगवंत रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, प्रसाद जगदाळे, सोनाली झगडे, साक्षी काशीद व इतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या रक्त संकलन केले .


 
Top