तुळजापूर (प्रतिनिधी)- मस्साजोगा सरपंच स्व. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या निषेधार्थ सोमवार दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल कार्यालयासमोर सकल मराठा समाज व बहुजन समाज यांच्यावतीने शासनाने या प्रकरणी बोंब मारण्याची वेळ आणल्याचा आरोप करीत बोंब मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी या सरकारचे करायचे काय खालीमुंडके वर पाय अशा घोषणा देत बोंब मारीत आंदोलन केले. सरकारने याची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात मोठ्या संखेने मराठा समाज सहभागी झाला होता. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मान्यवर म्हणाले कि, या प्रकरणी चौकशी अडथळा होवु नये म्हणून धनंजय मुंढे, पंकजा मुढे यांना मंञीमंडळात घेवू नये असे आवाहन केले होते. तरीही मंञी केले. यातुन सरकारने काय साध्य केला असा सवाल करुन यातुन महाराष्ट्राला काय मेसेज मिळायाचा तो मिळाला असे यावेळी म्हणाले. सरंपच देशमुख यांची हत्या लोकशाही संविधान न मानणाऱ्या टेररिस्ट लोकांनी केल्याचा आरोप करुन सरकार गुहेगारी मंडळीना पाठीशी घालत असल्याचा आरोप अनेकांनी सरकार वर केला. याचा मास्टर माँईड शोधुन त्यास फाशी द्या व वाल्मीक कराड वर कारवाई करा अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी दिला.
यावेळी सकल मराठा समाजाचे अजय सांळुके, महेश गवळी, अँड धिरज पाटील, अमोल कुतवळ, सुधीर कदम, दत्ता शिंदे, प्रशांत सोंजी, बाळासाहेब कदम, अमर चोपदार, राहुल खपले, कुमार टोले, धर्यशिल कापसे, शशीकांत नवले, सुदर्शन वाघमारे, आनंद जगताप, सागर इंगळे, हंगरगेकर, शेकडो समाज बांधव यावेळी उपस्थित होते. यावेळी मास्टर माँईड शोधुन कारवाई करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले.