धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन कंफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे मराठवाडा अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी केले.

धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी हॉटेल साई येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस मराठवाडा महिला संघटनेच्या अध्यक्ष सीता राम मोहिते पाटील, गोविंद साकला यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत धाराशिव व नळदुर्ग शहराची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. यावेळी प्रेरक वक्त्या मोहिते पाटील यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, व्यापाऱ्यांनी आई, पत्नीला सहभागी करुन आपल्या व्यवसायाची उन्नती करावी. तसेच सचोटीने व्यवसाय करुन व्यवसायाला बळकटी द्यावी. सध्या डिजिटल मार्केटिंगचा काळ असल्याने व्यापाऱ्यांनी यामध्येही सहभागी होऊन व्यापारात वृद्धी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, सचिव महेश वडगावकर, मराठवाडा उपाध्यक्ष संजय मोदानी, नूतन तालुकाध्यक्ष नितीन फंड, सचिव अजहर खान, परंडा तालुकाध्यक्ष तन्वीर  डोंगरे, सचिव  हणमंत विटकर, उपाध्यक्ष विनोद  घळके, नळदुर्ग शहराध्यक्ष सतीश पुदाले, मुकुंद नाईक तसेच सुभाष शेट्टी, जगदीश मोदानी, सलीम मणियार, नितीन नायर, गौरव बागल, सतीश हिंगमिरे, राधेश्याम बजाज, शिवलिंग गुळवे, किशोर राऊत, दत्तात्रय साळुंके, बाळकृष्ण शिंगाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top