धाराशिव (प्रतिनिधी)- देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीदिनामित्त बीड येथे २२ व २३ डिसेंबरला मोफत कृत्रिम हात व पाय वाटप आणि नेत्ररोग शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास कुंभार यांनी दिली.

देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीदिनामित्त कुंभार समाज विकास संस्था, बीड. व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. हात व पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अद्यावत टेक्नॉलॉजीव्दारे व उच्च दर्जाच्या फायबरपासून बनविलेले तसेच अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय यांचे मोफत वाटप या शिबिरात होणार आहे.  २२ डिसेंबर रोजी केले आहे. शिबिराच्या दिवशी पायाची व हाताची मापे घेतली जातील. माप घेतल्यानंतर ३० ते ३५ दिवसानंतर अवयव वितरण केले जाणार आहे. हे कृत्रिम हात व पाय लावल्यानंतर मनुष्य चालू शकतो, सर्व दैनंदिन कामे करु शकतो. जिनासुध्दा चढू शकतो, सायकल सुध्दा चालवू शकतो. तरी गरजूंनी व त्यांच्या नातेवाईकांनी २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉटेल ग्रँड यशोदा, राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर, बार्शी नाका रोड, बीड येथे उपस्थित राहावे.

तसेच कुंभार समाज विकास संस्था, बीड व श्री. आनंदऋषीजी हॉस्पीटल, मेडिकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर (अहमदनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बीड येथील हॉटेल ग्रँड यशोदा येथे मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर होणार आहे.

या दोन्ही शिबिरांसाठी नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी रामदास कुंभार ९८६०५७२३८३ व चनबस वायकर ९८२२४८१३८२ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 
Top