कळंब  (प्रतिनिधी)- केंद्र येरमाळा येथील प्रभारी केंद्रप्रमुख भाऊसाहेब जाधवर  जातीयवादी  वागत आहेत.  केंप्राशा येरमाळा व कन्या प्राशा. येरमाळा शाळेच्या वार्षिक तपसणीस केल्यावर जनरल रजिस्टर तपासणी करतांना  ज्या विद्यार्थ्यांच्या समोरील जातीच्या रकान्यात कुणबी कींवा कुणबी मराठा लिहले आहे  या नोंदी कशाच्या आधारे घेतल्या यांचा तुमच्याकडे पुरावा आहे का .म्हणून मुख्याध्यापकांना विचारतात खरे पाहता नियमानुसार पालकांने प्रवेश अर्जावर जी जात नोंदवली आहे तीच जात जनरल रजिष्टरवर लिहावी लागते .

पण श्री जाधवर हे  फक्त कुणबी व कुणबी मराठा याचाच फक्त पुरावा मागतात इतर कोणत्याही जातीचा पुरावा मागत नाहीत. कोणत्याही जातीच्या पालकास  आपल्या पाल्याचा शाळेत इयत्ता  १ लीत प्रवेश  घेताना जातीच्या पुराव्याची अवश्यकता लगत नसतांना  फक्त कुणबी व कुणबी मराठा समाजाच्या मुलांचा शाळेत प्रवेश घेतांना हे जातीचा पुरावा का मागतात इतर जातीच्या पालकाकडे जातीचा पुरावा का मागत नाहीत याचाच अर्थ हे मराठा समाजाचा द्वेश करतात व विद्यार्थी व पालक यांच्याबरोबर जातीयवादी वागून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत .

तरी अश्या जातीयवाटी प्रमुख केंद्र प्रमुख  यांचा केंद्र प्रमुख पदाचा पदभार काढुन त्वरीत निलंबनाची कार्यवाही करुन  विभागीय चौकशी लावावी ही विनंती नसता सकल मराठा कळंब चा वतीने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदना त देण्यात आला.

 
Top