कळंब (प्रतिनिधी)- प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण, उपजिल्हा रुग्णालय कळंब मार्फत जिल्हा शल्य आरोग्य अधिकारी डॉ. सतिष हरदास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर सर यांच्या संकल्पनेतून, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सय्यद सर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी सर तसेच प्रभारी वैध्यकीय अधीक्षक डॉक्टर शेळके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्री बाई फुले कन्या प्रशाला शिराढोण येथे” मैत्री -किशोरवयीन मुलींशी संवाद“ तसेच क्षय रोग नियंत्रण व निर्मूलन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस जिल्हा समन्वयक सुनीता साळुंखे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण डॉक्टर योगिता चौधरी,  समुपदेशक श्रीमती प्रगती भंडारी,प्राथमिक आरोग्य केंद्र शिराढोण येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ्‌‍ श्री दिनेश कावळे, / श्रीमती दुगाने, आरोग्य सेवक श्री देशपांडे काका, पथकाचे डॉक्टर मोहोळकर, डॉक्टर शिंदे, श्रीमती बाबर, श्रीमती लोंढे,उपस्थित होते यावेळी किशोर वईन मुलींच्या समस्या व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.


 
Top