तुळजापूर (प्रतिनिधी)-  साप्ताहीक  सुट्टी, पोर्णिमा पार्श्वभूमीवर रविवार दि. 15 डिसेंबर रोजी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची प्रचंड गर्दी  झाली होती. पोर्णिमे निमित्ताने मंदीर गर्भगृह आकर्षक फुलांनी सजवले होते. आज पहाटे पासुन ते राञी पर्यत भाविकांची गर्दी मोठी होती. आज धर्म, अभिषेक, पेड दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या.

शनिवारी रात्री सिंह वाहनावर छबिना संपन्न झाला. महंत वाकोजी बुवा गुरु यांनी देविजींची प्रक्षाळ पुजा केल्यानंतर मंदीर प्रांगणात आपल्या उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर मार्गशिष पोर्णिमेचा धार्मिक  विधीचा सांगता झाला. आज व्हिआयपी नातेवाईक भाविकांनी मोठी गर्दी केल्याने याचा फटका भाविकांना देवीदर्शन घेताना बसला.

 
Top