धाराशिव (प्रतिनिधी)- विना अनुदानित कर्मचाऱ्यांचा टप्पा वाढ हा जिव्हाळ्याचा व रोजी रोटीचा प्रश्न होता. हा टप्पा वाढ आदेश देण्याचा प्रश्न महाराष्ट्रात लातूर विभागाने प्रथम सोडवल्याने शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला. महाराष्ट्र शासनाचे अनुदान वितरणाचे आदेश निघाल्यास तात्काळ विना अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ अनुदान मिळेल. अशी ग्वाही लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांनी दिली.

ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ जिल्हा धाराशिव व कायम विना अनुदानीत कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोरे यांनी टप्पा वाढ अनुदान मिळवून देण्यास मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार भाई उद्धवराव पाटील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था म. धाराशिव च्या कार्यालयात 14 डिसेंबर रोजी आयोजित केला होता त्यावेळी मोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कायम विनाअनुदानित कृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष बिभिषण रोडगे होते .यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी तांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष बालाजी इतबारे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार मेंढेकर, जिल्हा उपाध्यक्ष नारायण खैरे व संभाजी गायकवाड,विकास वाघमारे आदीसह अनेक शिक्षण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. प्रारंभी मान्यवरांनी गणपतराव मोरे यांचा फेटा बांधून, शाल, पुष्पहार व बुके देऊन पेढा भरवून सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमास एकनाथ चव्हाण, अमोल घोगरे, प्रा. राहुल पाटील, जगन्नाथ माळी,जयपाल चोबे, एडके, अरुण माडेकर, पी .एन. चव्हाण, ताटे, खैरुद्दीन सय्यद, आशिष होळे, गिरवलकर यांच्यासह  संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बालाजी तांबे व नारायण खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ चव्हाण यांनी केले. तर सूत्रसंचालन राजकुमार मेंढेकर यांनी केले. शेवटी उपस्थित यांचे आभार शहराध्यक्ष प्रा. राहुल पाटील यांनी मानले.


 
Top