तुळजापूर (प्रतिनिधी) - ओबीसी नेते माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांना मंत्री मंडळात स्थान न दिल्याबद्दल ओबीसी समाज बांधवांनी मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर आक्रोश करुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीर निषेध केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुखमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया विभागाने छगन भुजबळ यांची पक्षातुन हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे केली आहे.
ओबीसी नेते आमदार छगन भुजबख, गोपीचंद पडळकर यांना मंत्री मंडळात न घेतल्याने तहासिल कार्यालयासमोर ओबीसी समाज बांधवांतर्फ अजित पवार यांचा जाहीर निषेध करुन आक्रोश केला. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करुन, अध्यक्ष अजित पवार यांचा अवमान करुन पक्षाची अहवेलना केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतुन छगन भुजबळ यांची हक्कालपट्टी करण्याची मागणी सोशल मिडीया प्रमुख बबनराव गावडे यांनी थेट अध्यक्ष अजित पवार व सुनिल तटकरे यांच्य कडे केल्याने आज या घडलेल्या घटनेची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत होती.