तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सव यजमानपदाचा मान यंदा पाळीकर पुजारी मंडळास मिळाला आहे. बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी पुजारी मंडळ कार्यालयात यजमानपदाचे नाव चिठ्ठी टाकुन काढण्यात येवुन त्यात प्रा. विवेक शिवाजीराव गंगणे यांची चिठ्ठी निघाल्याने शाकंभरी नवरात्र उत्सव यजमानपदी त्यांची निवड झाली.

निवडीनंतर पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, संचालक प्रा. धनंजय लोंढे, संचालक लालासाहेब मगर, संचालक अविनाश गंगणे, संचालक  नरेश अमृतराव, संचालक शिवाजी बोदले, विकास खपले, सागर इंगळे यांनी त्यांचा सत्कार केला. शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या यजमानपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. यजमानपदासाठी पुजारी मंडळाकडे 15 पुजाऱ्यांनी अर्ज केले होते. आता शाकंभरी नवरात्र उत्सवाचे धार्मिक विधी यजमानांचा हस्ते संपन्न होणार आहेत.

 
Top