तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील तामलवाडी सह परीसरात बिबट्या आढळुन आल्याचे पार्श्वभूमीवर वन विभागाचा पथकाने सदरील भाग पिंजून.काढला असता बिबट्या आढळला नसल्याची माहीती वनविभागाने दिली.
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी नंतर आता तामलवाडी येथील साठवण तलावाच्या परीसरात पिंपळा बु. येथील शेतकऱ्यांनी बिबट्या आढळून आल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी वनविभाग पथकाने सदरील भाग पिंजून काढला असता तिथे बिबट्या आढळला नाही.