धाराशिव (प्रतिनिधी)- विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव तर्फे सालाबादाप्रमाणे याही वर्षी 2024-25 चे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते संदीप गौतमराव इंगळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी समितीचे मार्गदर्शक प्रकाशराव जगताप, विश्वास आप्पा शिंदे,भारत कोकाटे, जयंत भाऊ पाटील, भारत इंगळे, बाळासाहेब शिंदे, सुनील काकडे, खलील सर, खलिफा कुरेशी, मैनुद्दीन पठाण, अभय इंगळे, चंद्रजित जाधव, संतोष पवार, मिनील उर्फ पल्लू काकडे, अभिजित काकडे, कुणाल निंबाळकर, पिराजी मंजुळे, सिद्धार्थ बनसोडे, विजय मुद्दे, समितीचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, धनंजय राऊत, इंद्रजीत देवकते, अभिषेक बागल, रोहित पडवळ, बलराज रणदिवे, राम मुंडे, योगेश सोन्ने पाटील, दाजी पवार तसेच मोठ्या संख्येने सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी समितीच्या प्रमुख मार्गदर्शकांनी हा शिवजन्मोत्सव सर्व जाती धर्मांना, विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष यांना सोबत घेऊन कोणताही अभिनिवेश न बाळगता शांततेच्या मार्गाने शिवरायांच्या विचाराने मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करावा असे आवाहन केले. सदर बैठकीतचे प्रास्ताविक अमरसिंह देशमुख यांनी केले .सूत्रसंचालन भालचंद्र कोकाटे यांनी केले. तर आभार राम मुंडे यांनी मानले.


 
Top