तेर (प्रतिनिधी )-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आयोजित मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात २६ रूग्णांवर मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ अयुब शेख यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ गुरूबस शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० नेत्र रूग्नांची तपासणी केली.तपासलेल्या रुग्णांना धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी २६ रूग्नावर मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या.


 
Top