तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे रविवार दि. 28 डिसेंबर रोजी रात्री घाटशिळ रोड वाहनतळ समोरील रस्त्यावर वाहनतळ पावतो पाडण्यावरुन रायगड जिल्हयातील भाविक व पार्कींग वसुली कर्मचाऱ्यांमध्ये पावती फाडण्यावरुन शाब्दीक चकमकी घडल्याने या प्रकरणी राञी अपराञी भाविकांशी  घडणाऱ्या शाब्दीक चकमक घटना घडू नये यासाठी  संबंधित वरिष्ठ अधिकारी वर्गाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, सध्या नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविक खाजगी वाहनांनी मोठ्या संखेने येत असल्याने वाहनतळे भरुन भाविकांचे वाहने रस्त्यावर लावण्याची वेळ येत आहे. त्यातच वाहतुक नियंञण बाबतीत कुणीही नियोजन करीत नसल्याने पार्कींग ठेकेदार, वाहन मालक यांच्यात पार्कीग पावती फाडण्यावरुन शाब्दीक चकमकीतुन वादावादी होत आहेत. 

रविवार दि. 28 डिसेंबर  रोजी बारा ते सव्वा बारा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक व 108 भक्तनिवासकडे जाणाऱ्या भर रस्त्यामध्ये भक्ताची गाडी अडवून वाहन तळ पावती फाडण्यावरुन शाब्दीक चकमक होवु लागली. एका स्थानिकाने पार्किंग पावती वाहनतळात वाहन उभे केले तरच फाडायाची रस्त्यावर पावती फाडण्याचा अधिकार आहे का असा सवाल केला. अखेर अनेकांनी मध्यस्थी करुन राञी चालु असलेला वाद मिटवला.

 
Top