तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मेसाई जवळगातील सरपंच वर झालेल्या प्राणघातक हल्यातील आरोपीना अटक करावे. त्यांना पोलिस संरक्षण द्यावे या मागणीसाठी रविवार दि. 29 डिसेंबर रोजी मेसाई जवळगा ग्रामस्थ व सरपंचाने पाण्याचे टाकी वर चढुन न्याय मिळण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केले.

गुरुवारी सरपंच निकम यांच्यावर रात्री प्राणघातक हल्ला झाला होता. हा हल्ला येथे चालु काम असलेल्या पवनचक्की वाल्यांकडुन केला गेल्याचा संशय  व्यक्त  होत होता.  या प्रकरणी तपासात अपेक्षित वेग नसल्याने व सरपंचांना पोलिस संरक्षण  मिळत नसल्याच्या निषेधार्थ मेसाई जवळगा ग्रामस्थ गावातील पाण्याच्या टाकी जवळ जमुन सरपंचासह ग्रामस्थ पाणी टाकीवर चढुन आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. महाराष्ट्राचा बिड, बिहार करु नका असा घोषणा देत गावातील स्ञी-पुरुषांनी आंदोलन सुरु केले. आज सरपंचावर हल्ला झाला. यापुढे सदस्य, ग्रामस्थांवर होईल. तरी असा हल्ला येथे झाल्यास येथे कार्यरत असलेल्या  पवनचक्की अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.


 
Top