तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेञ तुळजापूर शहरापासुन अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचुंदा तलाव वनक्षेञात बिबट्याचे ठसे दिसल्याची चर्चा सोशल मिडीयावर होताच वनविभाग पथक तात्काळ दाखल झाले.  ठसे वर तपासणीस पाठवले असता ते तरसाचे असल्याचे सांगण्यात आल्याने जनतेने सर्तक राहावे अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.

तिर्थक्षेत्र तुळजापूर शहराजवळील पाचुंदा तलाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा फोन वनविभागाला येताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी येवुन ठशांची माहीती वनविभागाचा वरिष्टांना पाठवली. त्यांनी त्या ठशाचे परिक्षण केले असता ते ठसे तरसाचे असल्याचे दिसुन आले. तसेच वनक्षेत्रात वनविभाग पथक फिरुन आले असता त्यांना बिबट्याचे अस्तित्व दिसुन आले नाही. या प्रकरणी वनविभागाने तालुक्यात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता गृहीत धरली असून, तरी नागरिकांनी सर्तक राहावे अफवेवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.

 
Top