तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काक्रंबा तालुका तुळजापूर या शाळेत शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी  बालगोपाळांचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न  झाला. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच कालिदास खताळ, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य प्रियंका क्षीरसागर, पिरॅमल फाउंडेशन फाउंडेशन जिल्हा समन्वयक श्रुती कापरे, तालुका समन्वयक प्रगती सिंग, गौरव पावसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर सोनवणे, सदस्य सुजित घोगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप घोगरे उपस्थित होते. 

इयत्ता पहिलीतील चौथी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी अतिशय नियोजन पद्धतीने आपापले स्टॉल  मांडले होते. यामध्ये पाणीपुरी वडापाव चहा अपे भेळ जिलेबी बालुशाही चिवडा खमंग ढोकळा भाजीपाला असे अनेक स्टॉल मांडले होते.  बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान होणे, नाणी व नोटांची ओळख, नफा-तोटा फायदा याचा अनुभव, विविध वस्तू संग्रह करणे, अशा अनेक बाबींचा अंतर्भाव यामध्ये येत असल्याने मुलांमध्ये एक नव चेतना निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचे मुख्याध्यापक उषा उंबरे यांनी प्रास्ताविक मध्ये म्हटले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक उषा उंबरे, वर्षा पाठक, जयश्री चव्हाण, संजीवनी सरवदे, दिपाली परदेशी, अश्विनी जोगदंड ,मीनाक्षी शिंगाडे, शितल गरड, उमेश सुर्वे छगन जगदाळे, जगन्नाथ वाघे, अनिल दहीहांडे, प्रीतम कुमार सोळुंके, विद्यासागर गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सुर्वे यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका संजीवनी सरवदे यांनी केले. उपक्रमासाठी पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हजारो रुपयांची उलाढाल करण्यात आली. विक्री करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना खूप आनंद देऊन गेल्याचे चेहऱ्यावर दिसून येत होते.

 
Top