भूम (प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भूम तालुक्यातील शाखा प्रमुखांची पदाधिकारी यांची बैठक जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली 

विधानसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. परंतू निष्ठावंत शिवसैनिकांनी खचून न जाता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपण अजून नेटानी कामाला लागून लोकांची अडीअडर्चीी सोडून पक्ष संघटना मजबूत व बळकट करण्यासाठी अजून आपण प्रयत्न करून, जिल्हाप्रमुख म्हणून सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागे खंबीरपणे मी उभा आहे.  असे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील बैठकीमध्ये सांगितले.

यावेळी भूम तालूका प्रमुख अनिल शेंडगे, उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, उमाताई रणदिवे, लांडे ताई,  गपाट ताई, सुधीर ढगे, श्रीमंत डोके, राजाभाऊ नलवडे, रफीक तांबोळी, अब्दुल सय्यद, अजय कोकाटे, अजित तांबे, लहू गोरे, शहाजी जगदाळे, सुनिल गपाट, श्रीमंत भडके, कानीफनाथ नलवडे, मनोज पेंटर, श्रीकांत केदारी,  बाबुराव सपकाळ, सुबूगडे, गना गुंजाळ, अशोक माने, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top