तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील सलगरा दि येथील कै. अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालयातील रितेश समाधान कदम याची वर्धा येथे होणाऱ्या शालेय क्रिडा स्पर्धा राज्यस्तरीय निवड चाचणी 19 वर्ष वयोगटतुन  क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रितेश समाधान कदम हा उत्कृष्ट असा अष्टपैलु क्रिकेटपटू असुन त्याने अनेक राज्यस्तरीय स्पर्धत यशस्वी कामगिरि केली आहे. त्याचा या यशाबद्दल कै. अंबुमाता कनिष्ठ महाविद्यालय  सलगरा (दि.) प्राचार्य. लोमटे डी. एन, उपप्राचार्य. चव्हाण एस. एन, क्रीडाशिक्षक श्रकांबळे व्ही. एम, प्रा.सोमवंशी. एस. डी, प्रा.पटेल. एफ. एफ, काटवटे. आर. टी  यांनी त्याचे अभिनंदन करुन त्यास शुभेच्छा दिल्या. रितेश हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा जिल्हाध्यक्ष समाधान कदम यांचे चिरंजीव आहेत.

 
Top