तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा गावातील मुख्य रस्त्यावर केले जाणारा नवा रस्ता काम रखडल्याने ग्रामवासियांचे प्रचंड हाल होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने ग्रामस्थांना पाण्यातुन मार्गक्रमण करावे लागले.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा ते सलगरा दि. काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे चालु आहे. काक्रंबा गावातील मुख्य रस्त्यावरील हे सहाशे फुट काम आहे.
माञ गावातील रस्त्या काम करण्यासाठी ठेकेदाराने हा रस्ता खोदला आहे. माञ गेली एक महिन्या पासुन हे काम थांबले आहे. यामुळे ग्रामस्थांना खोदलेल्या रस्त्यावरुन ये-जा करावि लागत आहे. सध्या थंडी दिवस असल्याने या रस्त्यावर चालणे प्रचंड ञासदायक होत आहे. या कामाचा साईटवर सार्वजनिक
सार्वजनिक विभाग बांधकाम खात्याचे अभियंता फिरकत नसल्याने या रस्ता कामाच्या दर्जा बाबतीत संशय व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकामा खात्याच्या खाली पासुन तालुका स्तरीय अभियंत्यांच्या दुर्लक्षाला अर्थकरण कारणीभूत असल्याचे बोलले जाते आहे. ऐकदंरीत या कामाकडे आता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा शाखेने लक्षघालावे अशी मागणी होत आहे.